DC vs RR IPL 2025 32nd Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 (IPL 2025) चा 32 वा सामना आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (DC vs RR) यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर (Arun Jaitley Stadium, Delhi) खेळला जाईल. या हंगामात, दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व अक्षर पटेल (Axar Patel) करत आहे. तर, राजस्थान रॉयल्सची कमान संजू सॅमसनवर (Sanju Samson) आहे. दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत एकूण पाच सामने खेळून एक पराभव पत्करला आहे. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सने सहा सामने खेळून दोन सामने जिंकले तर चार सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान, राजस्थानने नाणेफेकून जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, करुण नायर, केएल राहुल (विकेटकीपर), अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, विप्रज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, नितीश राणा, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेश थेक्षाना, संदीप शर्मा, तुषार देशपांडे
🚨 Toss 🚨@rajasthanroyals won the toss and elected to bowl against @DelhiCapitals in Match 32.
Updates ▶ https://t.co/clW1BIPA0l#TATAIPL | #DCvRR pic.twitter.com/SSsD99s8dN
— IndianPremierLeague (@IPL) April 16, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)