आज आयपीएल 2023 चा 11 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात आहे. हा सामना गुवाहाटी येथे खेळला जात आहे. राजस्थानची सुरुवात चांगली झाली होती. राजस्थानने पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा 72 धावांनी पराभव केला. मात्र, यानंतर राजस्थानला पंजाब किंग्जविरुद्ध 5 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. दिल्लीने दोन सामने खेळले असून दोन्ही सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. आजच्या रोमांचक सामन्यात संजू सॅमसन आणि डेव्हिड वॉर्नर आमनेसामने आहेत. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, नाणेफेक हारल्यानंतर राजस्थान रॉयल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत चार गडी गमावून 199 धावा केल्या. राजस्थान रॉयल्सकडून सलामीवीर जोस बटलरने झटपट खेळी करताना 79 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून मुकेश कुमारने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. हा सामना जिंकण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स संघाला 20 षटकात 200 धावा करायच्या आहेत.
Innings Break!@rajasthanroyals score a solid first-innings total of 199/4 in the first innings 👌🏻👌🏻
A challenging chase coming up for #DC. Can they do it❓
Scorecard ▶️ https://t.co/FLjLINwRJC#TATAIPL | #RRvDC pic.twitter.com/wNDrEnvSDY
— IndianPremierLeague (@IPL) April 8, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)