LSG vs RR, IPL 2024: आज इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 44 वा सामना (IPL 2024) लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स (LSG vs RR) यांच्यात खेळला जात आहे. लखनौचे होम ग्राऊंड असलेल्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे. या मोसमातील ही दुसरी वेळ आहे, जेव्हा लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आमनेसामने आहेत. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील संघ राजस्थान रॉयल्सने या हंगामात आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. पॉइंट टेबलमध्ये राजस्थान रॉयल्स पहिल्या स्थानावर आहे. त्याचबरोबर लखनौ सुपर जायंट्स 8 पैकी 5 सामने जिंकून 10 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. दरम्यान, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), रोवमन पॉवेल, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल
लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक, केएल राहुल (कर्णधार/विकेटकीपर), मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसिन खान, यश ठाकूर
🚨 Toss Update from Lucknow 🚨@rajasthanroyals win the toss & elect to bowl against @LucknowIPL
Follow the Match ▶️ https://t.co/Dkm7eJqwRj#TATAIPL | #LSGvRR pic.twitter.com/F09WUphJcQ
— IndianPremierLeague (@IPL) April 27, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)