Fact Check: पत्नी परिणीती चोप्रासोबत आयपीएल मॅच पाहण्यासाठी राघव चढ्ढा पोहोचला चंदीगड? सोशल मीडियावर फोटो झाला व्हायरल; जाणून घ्या काय आहे सत्य

आप नेते राघव चढ्ढा (Raghav Chadha) याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोत राघव चढ्ढा आपल्या पत्नीसह पंजाब आणि दिल्ली कॅपिटल्समधील सामना पाहण्यासाठी चंदीगडला पोहोचला आहे. राघव चड्ढा यांना सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे.

Fact Check: पत्नी परिणीती चोप्रासोबत आयपीएल मॅच पाहण्यासाठी राघव चढ्ढा पोहोचला चंदीगड? सोशल मीडियावर फोटो झाला व्हायरल; जाणून घ्या काय आहे सत्य

आयपीएल 2024 चा (IPL 2024) दुसरा सामना पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स (PBKS vs DC) यांच्यात खेळला गेला. दोन्ही संघांमधील हा सामना चंदीगडमधील मुल्लानपूर येथे झाला. या रोमांचक सामन्यात पंजाब किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा चार गडी राखून पराभव केला आहे. यासह पंजाब किंग्जने यंदाच्या मोसमात विजयासह आपला प्रवास सुरू केला आहे. दरम्यान, आप नेते राघव चढ्ढा (Raghav Chadha) याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोत राघव चढ्ढा आपल्या पत्नीसह पंजाब आणि दिल्ली कॅपिटल्समधील सामना पाहण्यासाठी चंदीगडला पोहोचला आहे. राघव चड्ढा यांना सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे. काही सोशल मीडिया यूजर्सचे म्हणणे आहे की, अरविंद केजरीवाल तुरुंगात आहेत आणि राघव चढ्ढा आयपीएल पाहण्यासाठी गेले आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, ही फोटो आयपीएलच्या शेवटच्या सीझनमधील आहेत. गेल्या वर्षीचा फोटो आज व्हायरल होत आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 23, 2024 08:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).