GT vs PBKS, IPL 2024 17th Match: इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 17 वा (IPL 2024) सामना आज गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज (GT vs PBKS) यांच्यात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरू होईल. लीगच्या 17व्या हंगामात दोन्ही संघांची कामगिरी आतापर्यंत चांगली झाली आहे. दोन्ही संघांनी दोन सामने जिंकले असून एक सामना गमावला आहे. आयपीएलमध्ये दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा आहे. दरम्यान, पंजाबने टाॅस जिंकून गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): ऋद्धिमान साहा, शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, केन विल्यमसन, विजय शंकर, अजमतुल्ला उमरझाई, राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, उमेश यादव, दर्शन नळकांडे
पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, जितेश शर्मा (विकेटकीपर), प्रभसिमरन सिंग, सॅम कुरान, शशांक सिंग, सिकंदर रझा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग
🚨 Toss 🚨@PunjabKingsIPL win the toss and elect to bowl against @gujarat_titans
Follow the Match ▶️ https://t.co/0Sy2civoOa #TATAIPL | #GTvPBKS pic.twitter.com/jgND8Lz07O
— IndianPremierLeague (@IPL) April 4, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)