PBKS vs GT, IPL 2024: आयपीएल 2024 मध्ये, (IPL 2024) पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स (PBKS vs GT) 21 यांच्यांत मुल्लानपूरच्या महाराजा यादवेंद्र सिंह स्टेडियमवर सायंकाळी साडेसात वाजता सामना खेळवला जाणार आहे. पंजाब किंग्जला मागील तीन सामन्यांत सलग पराभवाचा सामना करावा लागला आहे. पंजाबने 7 पैकी फक्त 2 सामने जिंकले आहेत, तर 5 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. ते 4 गुणांसह गुणतालिकेत 9व्या क्रमांकावर आहेत. अशा स्थितीत त्यांना विजयाचे वेध लागणार आहेत. दुसरीकडे, गुजरात टायटन्सने 7 पैकी 3 सामने जिंकले आहेत आणि 5 सामने गमावले आहेत. शुभमन गिलचा संघ 6 गुणांसह गुणतालिकेत 8व्या स्थानावर आहे. दरम्यान, पंजाबने गुजरातविरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल(कर्णधार), डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, नूर अहमद, संदीप वॉरियर, मोहित शर्मा
पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): सॅम कुरन (कर्णधार), प्रभसिमरन सिंग, रिली रोसो, लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग
Match 37. Punjab Kings Won the Toss & elected to bat https://t.co/avVO2pBYUg #TATAIPL #IPL2024 #PBKSvGT
— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)