PBKS vs SRH, IPL 2024 69th Match: इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 69 वा सामना आज सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज (SRH vs PBKS) यांच्यात हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. या मोसमातील दोन्ही संघांमधील ही दुसरी लढत आहे. पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने 2 धावांनी विजय मिळवला होता. सनरायझर्स हैदराबादने तिसरा संघ म्हणून प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. त्याचबरोबर पंजाब किंग्ज आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे. दरम्यान, पंजाब किंग्जचा कर्णधार जितेश शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पंजाब किंग्जने हैदराबादसमोर 215 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पंजाब किंग्जच्या वतीने सलामीवीर प्रभसिमरन सिंगने सर्वाधिक 71 धावांची खेळी खेळली. सनरायझर्स हैदराबादकडून टी नटराजनने सर्वाधिक दोन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी सनरायझर्स हैदराबाद संघाला 20 षटकात 215 धावा करायच्या आहेत.
Innings break in Hyderabad!
Prabhsimran Singh (71), Rilee Rossouw (49), Atharva Taide (46) lift #PunjabKings to 214/5 against #SunrisersHyderabad
Follow Live: https://t.co/HAOzKYaZdG pic.twitter.com/ag3fCU5i15
— TOI Sports (@toisports) May 19, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)