टीम इंडिया आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) चे सलामीवीर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) प्रेयसी निधी तापडियासोबत (Nidhi Tapadia) अबु धाबी येथे 23 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी (IIFA) पुरस्कार सोहळ्यात 26 मे रोजी पोहोचला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही खूप चर्चेत आहे. व्हायरल भयानीने इंस्टाग्रामवर पृथ्वी शॉ आणि त्याच्या प्रेयसीचा व्हिडिओ शेअर केला आहे. यावेळी पृथ्वी शॉ काळ्या रंगाचे जॅकेट, काळा शर्ट, काळी जीन्स आणि काळी टोपी घातलेला दिसला. दुसरीकडे मॉडेल आणि अभिनेत्री निधीने काळ्या रंगाची साडी नेसली होती. दोघांनी आयफाच्या ग्रीन कार्पेटवर फोटोग्राफर्सना एकत्र पोज दिली. अलीकडेच शॉ वादामुळे चर्चेत आला होता. भोजपूरी चित्रपट अभिनेत्री सपना गिलसोबत त्याचे भांडण झाले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)