PAK vs NZ 3rd ODI: न्यूझीलंड आणि पाकिस्तान (Pakistan vs New Zealand) यांच्यात खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान माउंट मौंगानुई येथील बे ओव्हल येथे एक विचित्र घटना घडली. पाकिस्तानच्या धावांचा पाठलाग करताना दुसऱ्या डावात जेव्हा जेकब डफी 39 व्या षटकातील तिसरा चेंडू टाकण्यासाठी धावला आणि पाकिस्तानचा तैयब ताहिर स्ट्राईकवर होता. स्टेडियममधील वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे, दिवे गेले आणि प्रसारकांनाही धक्का बसला. खेळाच्या या टप्प्यात, फक्त सीमारेषेवर असलेले जाहिरात बोर्डच दिसत होते. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लाईट गेल्यामुळे सर्वांचाच अचानक गोंधळ उडाला. सगळे घाबरले. एवढ्या मोठ्या संख्येने लोक असताना असे होणे हे घातक होते. सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, किवी संघाने पाकिस्तानला 43 धावांनी पराभूत केले आणि एकदिवसीय मालिका 3-0 ने जिंकली.
#NZvsPAK #NZvPAK @jophinjsrt10 pic.twitter.com/6O2mmC7oxf
— Nothing But CRICKET( @jophinjsrt10 ) (@NBC24x7) April 5, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)