PBKS vs RCB IPL 2021 Match 26: कर्णधार केएल राहुलच्या (KL Rahul) नाबाद 91 धावा, क्रिस गेलच्या (Chris Gayle) 46 धावा आणि हरप्रीत ब्रारच्या (Harpreet Brar) छोटेखानी नाबाद 25 धावांच्या खेळीच्या जोरावर पंजाब किंग्सने (Punjab Kings) निर्धारित ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 179 धावसंख्या गाठली आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला (Royal Challengers Bangalore) विजयासाठी 180 धावांचे तगडं आव्हान दिलं आहे. पंजाबकडून या तीन फलंदाजांना वगळता अन्य दुहेरी धावसंख्या गाठू शकले नाही. दुसरीकडे, पर्पल कॅपचा मानकरी हर्षल पटेल (Harshal Patel) आरसीबीसाठी (RCB) सर्वात महागडा बॉलर ठरला. हर्षलने 4 ओव्हरमध्ये 53 धावा दिलेल्या शिवाय त्याला एकही विकेट मिळाली नाही. आरसीबीसाठी काईल जेमीसनने सर्वाधिक 2 विकेट्स काढल्या तर युजवेंद्र चहल व शाहबाझ अहमदला प्रत्येकी 1 विकेट मिळाली.
INNINGS BREAK! @PunjabKingsIPL post 1⃣7⃣9⃣/5⃣ on the board against #RCB! @klrahul11 9⃣1⃣*@henrygayle 4⃣6⃣
The @RCBTweets chase shall begin shortly! #VIVOIPL #PBKSvRCB
Scorecard 👉 https://t.co/GezBF86RCb pic.twitter.com/JBf6Dmjzsv
— IndianPremierLeague (@IPL) April 30, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)