चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) कर्णधार महेंद्र सिंह धोनीसाठी (MS Dhoni) पंजाब किंग्स (Punjab Kings) विरोधात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवझर होणार सामना खास ठरला आहे. चेन्नई सुपर किंग्ससाठी आजचा सामना धोनीच्या टी-20 कारकिर्दीतील 200वा सामना आहे. पंजाब किंग्सविरुद्ध टॉससाठी मैदानावर उतरताच धोनीने हा कारनामा केला आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) धोनीने सीएसकेसाठी 176 सामने खेळले असून चॅम्पियन्स टी-20 लीगमध्ये संघाकडून 24 सामन्यात झळकला आहे. शिवाय, माजी भारतीय कर्णधाराने 2016-17 हंगामात 30 आयपीएल सामन्यांमध्ये राइजिंग पुणे सुपरजायंटचे प्रतिनिधित्व केले होते.
7⃣ PM! Our heartbeat going 💛 "thala thala" 200*#Thala200 #PBKSvCSK #WhistlePodu #Yellove 🦁 pic.twitter.com/EKk75Xr0f0
— Chennai Super Kings - Mask P😷du Whistle P🥳du! (@ChennaiIPL) April 16, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)