IND vs PAK, 19th Match: आज टी-20 विश्वचषक 2024 च्या 19 व्या (T20 World Cup 2024) सामन्यात भारताचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी (IND vs PAK) होत आहे. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर हा सामना खेळवला जात आहे. मागील सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ येथे पोहोचला आहे, तर गेल्या सामन्यात पाकिस्तानला अमेरिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. आज दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. दरम्यान, पाकिस्तानने टाॅस जिंकून प्रथम गोलदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.
पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): मोहम्मद रिझवान, बाबर आझम (कर्णधार), उस्मान खान, फखर जमान, शादाब खान, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, नसीम शाह, मोहम्मद अमीर
WT20 2024.Pakistan Won the Toss & elected to Field https://t.co/M81mEjp20F #T20WorldCup #INDvPAK
— BCCI (@BCCI) June 9, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)