आशिया चषक 2023 च्या (Asia Cup 2023) सुपर फोरमधील पाचवा सामना पाकिस्तान आणि श्रीलंका (PAK vs SL) यांच्यात कोलंबोमध्ये खेळला जात आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा असेल. यात जो संघ जिंकेल तो अंतिम फेरीत प्रवेश करेल. सुपर फोरमध्ये प्रत्येकी दोन सामने खेळल्यानंतर पाकिस्तान आणि श्रीलंकेचे प्रत्येकी दोन गुण झाले आहेत. दरम्यान, पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाने 42 षटकांत 7 गडी गमावून 252 धावा केल्या. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने सर्वाधिक नाबाद 86 धावांची खेळी केली. श्रीलंकेकडून मथिशा पाथिरानाने सर्वाधिक तीन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी श्रीलंकेच्या संघाला 42 षटकात 253 धावा करायच्या आहेत.
Sri Lanka have a big task ahead.
Pakistan post 252/7 in 42 overs - it'll be some chase if Sri Lanka wins it! pic.twitter.com/SJAUFMFMxf
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 14, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)