PAK vs BAN 9th Match: पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या नववा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. रावळपिंडीमध्ये सततच्या पावसामुळे हा सामना नाणेफेकीशिवाय संपला. दोन्ही संघांचा या स्पर्धेतील हा शेवटचा सामना होता. या स्पर्धेत पाकिस्तानला एकही सामना जिंकता आला नाही. बांगलादेशविरुद्ध त्यांची प्रतिष्ठा वाचवण्याची शेवटची संधी होती पण पावसाने संपूर्ण खेळ खराब केला. यापूर्वी, रावळपिंडीमध्ये दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या स्पर्धेत पाकिस्ताला पहिला पराभव न्यूझीलंडकडून पत्कारावा लागला. त्यानंतर भारताने पाकिस्तानला हारवून स्पर्धेतुन बाहेर केले.
The host Pakistan ended the Champions Trophy without a single win. 🤯
- They finish with a just 1 point all thanks to the rain. 🌧️ pic.twitter.com/Ubnw01UGDY
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 27, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)