Rishabh Pant Video: भारताचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) गेल्या वर्षी याच दिवशी कार अपघातात जखमी झाला होता. आता या दुर्घटनेला पूर्ण वर्ष होत आहे. दरम्यान, आयपीएल फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) एक भावनिक व्हिडिओ शेअर केला आहे. हे पाहून सगळेच भावूक झाले आहेत. पंत हा दिल्ली कॅपिटल्सचा नियमित कर्णधार आहे. दिल्ली कॅपिटल्सने सांगितले की तो पुनरागमन करण्यास तयार आहे आणि आयपीएल (IPL 2024) च्या आगामी हंगामात संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. ऋषभ पंत 30 डिसेंबर 2022 रोजी कारने घरी परतत होता आणि अपघात झाला त्यावेळी तो एकटाच होता. रुरकीच्या नरसन सीमेवर हम्मादपूर झालजवळ त्यांची कार नियंत्रणाबाहेर गेली आणि रेलिंगला धडकली. यानंतर कारने पेट घेतला आणि उलटली. गाडी चालवताना पंत झोपी गेला त्यामुळे हा मोठा अपघात झाला. यानंतर त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे पंतच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला अनेक गंभीर दुखापत झाली. (हे देखील वाचा: Virat Kohli ने यावर्षी जगातील पहिल्या पाच लोकप्रिय खेळाडूंच्या यादीत नोंदवले आपले स्थान, जाणून घ्या कोणत्या क्रमांकावर आहेत Lionel Messi आणि Cristiano Ronaldo)
365 Days since that fateful night.
Every day since then has been nothing but full of gratitude, belief, self-care, hardwork and a never-give-up approach towards making a roaring comeback in the game that runs thick through his veins 🫰🏻
Here's to seeing the unorthodox,… pic.twitter.com/y5TD35RCrS
— Delhi Capitals (@DelhiCapitals) December 30, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)