टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात आज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या आवृत्तीचा अंतिम सामना (WTC Final 2023) खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना लंडनच्या केनिंग्टन ओव्हलवर खेळला जात आहे. पाचव्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. दरम्यान, अंतिम सामन्याच्या पाचव्या दिवशी टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नर यांच्यात काहीतरी बाचाबाची झाली. ज्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तत्पूर्वी, चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने दुसऱ्या डावात 40 षटकांत तीन गडी गमावून 164 धावा केल्या होत्या. सामन्याच्या पाचव्या दिवशी भारताला विजयासाठी 280 धावांची गरज आहे. भारताकडून विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे फलंदाजी करत आहेत.
Virat Kohli and David Warner having a chat. pic.twitter.com/EfCczimRmk
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 11, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)