कोलकाता: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना कोलकाता येथील मैदानावर खेळवण्यात आला. ज्यामध्ये टीम इंडियाचा डॅशिंग अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी (Nitsh Kumar Reddy) याने आपल्या क्षेत्ररक्षणाने सर्वांचे मन जिंकले. इंग्लंडसाठी, त्यांचा कर्णधार जोस बटलर स्फोटक फलंदाजी करत होता आणि त्याने अर्धशतक ठोकले. त्यानंतर त्याच्या एका शॉटवर, नितीश रेड्डीने सुपरमॅनचे रूप धारण केले, सीमारेषेवरून धावत जाऊन बटलरला बाद करण्यासाठी एक शानदार झेल घेतला. रेड्डीच्या झेलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हे देखील वाचा: IND vs ENG 1st Test 2025: कोलकातामध्ये टीम इंडियाने नावावर केला 'भीमपराक्रम', टी-20 मध्ये अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा संघ)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)