एकदिवसीय विश्वचषकाच्या (ICC Cricket World Cup 2023) दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानसमोर नेदरलँडचे (PAK vs NED) आव्हान आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे. सध्याच्या विश्वचषकात पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांच्यातील हा पहिला सामना आहे. नेदरलँडचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, नेदरलँड्सच्या गोलंदाजांनी पाकिस्तानला 286 धावांवर रोखले. बास डी लीडेच्या घातक गोलंदाजीसमोर पाकिस्तान संघ पूर्ण 50 षटकेही खेळू शकला नाही. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने 75 चेंडूत 68 तर सौद शकीलने 52 चेंडूत 68 धावा केल्या. तर नेदरलँड्ससाठी बास डी लीडेने सर्वाधिक चार विकेट घेतल्या.
PAKISTAN BOWLED OUT FOR 286...!!!!
Commendable bowling performance by the Netherlands led by Bas De Leede with a 4 wicket haul. A big task ahead for the Dutch to chase this down. pic.twitter.com/wQ0STLy7bA
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 6, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)