टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना आज रांचीमध्ये खेळला जात आहे. याआधी टीम इंडियाने एकदिवसीय मालिकेत दणदणीत विजय नोंदवला. भारतीय संघ हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टी-20 मालिकेत प्रवेश करणार आहे. टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 176 धावा केल्या. न्यूझीलंडकडून डॅरिल मिचेलने सर्वाधिक नाबाद 59 धावा केल्या. टीम इंडियाकडून वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी 20 षटकात 177 धावा करायच्या आहेत. दरम्यान, पहिल्या T20 सामन्यादरम्यान टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी पत्नी साक्षी धोनीसह टीम इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी स्टेडियममध्ये दिसला. धोनी सामन्यादरम्यान काही वेळा हस्तांदोलन करून चाहत्यांचे आभार मानताना दिसला. यासंबंधीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)