Maheesh Theekshana Hat-Trick: न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात (NZ vs SL 2nd ODI 2025) किवी संघाने 113 धावांनी विजय मिळवला. या विजयासह तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. श्रीलंकेचा हा सामना हरला असला तरी त्याचा फिरकीपटू महिष तिक्षनाने (Maheesh Theekshana) चमत्कार केला. या सामन्यात त्याने हॅट्ट्रिक घेत इतिहास रचला. वनडेमध्ये हॅट्ट्रिक घेणारा तो सातवा श्रीलंकेचा खेळाडू ठरला आहे. आणि 2025 मध्ये हा पराक्रम करणारा तो जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे. पावसामुळे हा सामना 37-37 षटकांचा झाला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 9 गडी गमावून 255 धावा केल्या. त्यानंतर श्रीलंकेचा डाव 30.2 षटकांत 142 धावांत गुंडाळला गेला.
2025’s first hat-trick! 🤩
Maheesh Theekshana becomes the 7th Sri Lankan to take 3 in 3 in ODIs!💪#NZvSLonFanCode pic.twitter.com/dZZs0cjsji
— FanCode (@FanCode) January 8, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)