MS Dhoni Viral Video: इंडियन प्रीमियर लीगच्या 17 व्या (IPl 2024) मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या पराभवानंतर चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) संघ स्पर्धेतूनही बाहेर पडला होता. सीएसकेचा संघ आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर एमएस धोनीनेही (MS Dhoni) क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. अलीकडेच एमएस धोनी बंगळुरूहून रांचीला परतला आहे. यादरम्यान एमएस धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वास्तविक, एमएस धोनी बेंगळुरू ते रांची या फ्लाइटमध्ये इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करताना दिसला होता. यादरम्यान महेंद्रसिंग धोनी स्वतः सामान ठेवताना दिसत आहे.

पाहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)