Mumbai vs Lucknow: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 45 वा सामना रविवार म्हणजे 27 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स (MI vs LSG) यांच्यात दुपारी 3.30 वाजता मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल. या हंगामात दोन्ही संघांची कामगिरी आतापर्यंत उत्कृष्ट राहिली आहे. या हंगामात मुंबई इंडियन्सचे नेतृत्व हार्दिक पांड्या करत आहे. तर, लखनौ सुपर जायंट्सची कमान ऋषभ पंतच्या खांद्यावर आहे. दरम्यान, लखनौ नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई संघ प्रथम फलंदाजी करेल.

पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): एडन मार्कराम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), अब्दुल समद, आयुष बडोनी, दिग्वेश सिंग राठी, रवी बिश्नोई, आवेश खान, प्रिन्स यादव, मयंक यादव

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रायन रिकेल्टन (विकेटकीपर), रोहित शर्मा, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, कॉर्बिन बॉश, ट्रेंट बोल्ट, दीपक चहर, कर्ण शर्मा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)