LSG vs PBKS, IPL 2024: आयपीएल 2024 चा (IPL 2024) 11 वा सामना शनिवारी लखनौच्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज (LSG vs PKS) यांच्यात खेळला जाईल. या सामन्याला भारतीय वेळेनुसार 7.30 वाजता सुरुवात होईल. लखनौला पहिल्याच सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून 20 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. दुसरीकडे, शिखर धवनच्या नेतृत्वाखालील पंजाबने त्यांच्या पहिल्या सामन्यात दिल्लीचा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात बंगळुरूकडून पराभवाचा सामना करावा लागला. पंजाब किंग्ज संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे, तर लखनौ शेवटच्या स्थानावर आहे. दरम्यान, हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केला जाईल. तुम्ही जिओ सिनेमावर ऑनलाइन स्ट्रीमिंग पाहू शकता.
The 𝕊𝕦𝕡𝕖𝕣 𝔾𝕚𝕒𝕟𝕥𝕤 are ready for their first home game against #PunjabKings 🔥
Watch #LSGvPBKS tonight at 6:30 PM with #IPLonJioCinema 👈#TATAIPL #JioCinemaSports pic.twitter.com/ywRb5Ix9cR
— JioCinema (@JioCinema) March 30, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)