इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या मोसमात आज लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना होत आहे. लखनौ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होत आहे. केएल राहुल हा लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार आहे. त्याचबरोबर सनरायझर्स हैदराबादची जबाबदारी एडन मार्करामच्या खांद्यावर आहे. दरम्यान, सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक जिंकून सनरायझर्स हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 121 धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादकडून राहुल त्रिपाठीने सर्वाधिक 35 धावांची खेळी केली. लखनौ सुपर जायंट्सकडून कृणाल पांड्याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. लखनौ सुपर जायंट्सला हा सामना जिंकण्यासाठी 20 षटकात 122 धावा करायच्या आहेत.
Match 10. 19.5: Jaydev Unadkat to Abdul Samad 6 runs, Sunrisers Hyderabad 121/8 https://t.co/3AtXI7lgak #TATAIPL #LSGvSRH #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 7, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)