LSG vs GT, IPL 2024 21st Match: आयपीएल 2024 चा 21 वा सामना आज संध्याकाळी लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स (GT vs LSG) यांच्यात होणार आहे. हा सामना भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियम, लखनौ येथे 7.30 वाजता खेळवला जाणार आहे. या सामन्यात दोन्ही संघ यंदाच्या मोसमात पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत. लखनौ या सामन्यात सलग तिसरा विजय नोंदविण्याचा प्रयत्न करेल, तर गुजरात शेवटच्या सामन्यात पंजाबविरुद्धच्या पराभवाची जखम विसरण्याचा प्रयत्न करेल. दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा होणार हे नक्की. लखनौ आणि गुजरात यांच्यात आयपीएलमध्ये आतापर्यंत चार सामने झाले आहेत. यामध्ये गुजरातने चारही सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर लखनौला प्रत्येक वेळी गुजरातविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान, हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केला जाईल. तुम्ही जिओ सिनेमावर ऑनलाइन स्ट्रीमिंग पाहू शकता.
A dedicated feed, just for your favourite heroes 📹
On HeroCam today - Rohit Sharma & Rishabh Pant followed by KL Rahul & Shubman Gill 🤩#IPLonJioCinema #TATAIPL #MIvDC #LSGvGT pic.twitter.com/EpMLrv8Fdu
— JioCinema (@JioCinema) April 7, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)