आयपीएल 2025 मध्ये सनरायझर्स हैदराबादची कामगिरी खूपच खराब राहिली आहे. या हंगामात त्यांच्यासाठी प्लेऑफचा मार्ग जवळजवळ बंद झाला आहे. या हंगामात संघाने आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत ज्यापैकी फक्त 3 सामने जिंकले आहेत. 6 गुणांसह, ते पॉइंट टेबलमध्ये आठव्या स्थानावर आहे. हैदराबादचा आता पुढचा सामना 2 मे रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध आहे. त्यामुळे सनरायझर्स हैदराबाद संघ भारताच्या शेजारील देश मालदीवमध्ये सुट्टी साजरी करण्यासाठी गेला आहे. संघाच्या दोन सामन्यांमध्ये एक आठवड्याचे अंतर आहे. 25 एप्रिलनंतर, संघाला आता त्यांचा पुढचा सामना 2 मे रोजी खेळायचा आहे. पुढच्या सामन्यात पॅट कमिन्सचा संघ गुजरात टायटन्सशी सामना करेल. हा सामना गुजराचतच्या होम ग्राउंड नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल.
Sun, sea, and a team retreat for our Risers in the Maldives! 🏖️✈️ pic.twitter.com/CyE0MvZHy3
— SunRisers Hyderabad (@SunRisers) April 26, 2025
A warm welcome for our Risers in Maldives for their team bonding retreat 🏖️🧡 pic.twitter.com/wirokoXuFb
— SunRisers Hyderabad (@SunRisers) April 27, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)