इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या मोसमातील 47 वा सामना आज सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स (SRH vs KKR) यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या मोसमात, येथे 200+ स्कोअर देखील बनविला गेला आहे आणि 144 च्या स्कोअरचा बचाव देखील केला गेला आहे. अशा स्थितीत आजच्या सामन्यात खेळपट्टीच्या मूडमध्ये अनिश्चितता असेल, पण वेगवान गोलंदाजांना या खेळपट्टीतून चांगली मदत मिळू शकते. या मोसमाच्या सुरुवातीला हे दोन्ही संघ आमनेसामने असताना सनरायझर्स हैदराबादने बाजी मारली होती. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार नितीश राणाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स संघाला तिसरा मोठा धक्का बसला. सलामीवीर जेसन रॉय 20 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाचा स्कोअर 50/3.
#KKR 3 down as Jason Roy departs!
Kartik Tyagi strikes in his first over as @mayankcricket takes the catch 👏 👏
Follow the match ▶️ https://t.co/xYKXAE6NDg#TATAIPL | #SRHvKKR pic.twitter.com/2R8oQ6Nd3S
— IndianPremierLeague (@IPL) May 4, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)