KKR vs RCB, IPL 2025 1st T20 Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 आजपासून सुरूवात झाली आहे. या हंगामातील पहिला सामना गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स क्रिकेट संघ (KKR) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू क्रिकेट संघ (RCB) यांच्यात कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर खेळला जात आहे. केकेआरने तीन वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. त्याच वेळी, आरसीबी संघाला आतापर्यंत एकदाही विजेतेपद जिंकता आलेले नाही. या हंगामात, केकेआरचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करत आहे. तर, आरसीबीची कमान रजत पाटीदार यांच्या खांद्यावर आहे. दरम्यान, आरसीबीने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या केकेआरने आरसीबीसमोर 175 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
A strong comeback from RCB to restrict KKR to 174/8 after an explosive start at Eden Gardens, with Ajinkya Rahane as the top scorer 💜💪🎯
Can RCB chase down this total? 🤔#KrunalPandya #AjinkyaRahane #IPL2025 #KKRvRCB #Sportskeeda pic.twitter.com/EbLJBcDfS7
— Sportskeeda (@Sportskeeda) March 22, 2025
रहाणेची बॅट गर्जली
कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 गडी गमावून 174 धावा केल्या. एकेकाळी केकेआरचा स्कोअर 9.5 षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात 107 धावा होता. तथापि, रहाणे आणि नरेन बाद होताच, केकेआरचे फलंदाज काहीही करू शकले नाहीत. कोलकाताकडून कर्णधार रहाणेने सर्वाधिक 56 धावा केल्या. नरेन 44 धावांची खेळी खेळली.
कृणाल पांड्याने घेतल्या 3 विकेट
दुसरीकडे, स्टार गोलंदाज जोश हेझलवूडने आरसीबी संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. आरसीबीकडून स्टार अष्टपैलू कृणाल पंड्याने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. कृणाल पंड्या व्यतिरिक्त जोश हेझलवूडने दोन विकेट घेतल्या. हा सामना जिंकण्यासाठी आरसीबी संघाला 20 षटकांत 175 धावा कराव्या लागतील. दोन्ही संघांना हा सामना जिंकून स्पर्धेत दोन गुण मिळवायचे आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)