आयपीएलच्या 40व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (DC vs SRH) पराभवाला सामोरे जावे लागले. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेला हा सामना सनरायझर्सने नऊ धावांनी जिंकला. कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादने 20 षटकांत 6 बाद 197 धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्स संघ 20 षटकांत 6 गडी गमावून 188 धावाच करू शकला. हैदराबादचे आठ सामन्यांत सहा गुण झाले असून ते नवव्या स्थानावरून आठव्या स्थानावर पोहोचला आहे. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सचा हंगामातील हा सहावा पराभव आहे. त्याचे आठ सामन्यांत केवळ दोन गुण झाले असून तो तळाच्या दहाव्या स्थानावर आहे.

ईथे पहा पॉइंट टेबलची स्थिती

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)