SA Beat NED, 16th Match: टी-20 विश्वचषक 2024 चा 16 वा सामना (T20 World Cup 2024) आज नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिका (NED vs SA) यांच्यात न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नेदरलँडचा चार गडी राखून पराभव केला आहे. तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या नेदरलँड संघाला निर्धारित 20 षटकांत 9 गडी गमावून केवळ 103 धावा करता आल्या. नेदरलँडसाठी सायब्रँड एंजेलब्रेक्टने सर्वाधिक 40 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून ओटनील बार्टमनने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 18.5 षटकांत सहा गडी गमावून लक्ष्य गाठले. डेव्हिड मिलरने दक्षिण आफ्रिकेकडून सर्वाधिक 59 नाबाद धावांची खेळी खेळली. नेदरलँड्सकडून व्हिव्हियन किंगमा आणि लोगन व्हॅन बीक यांनी प्रत्येकी सर्वाधिक दोन बळी घेतले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)