तीन टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 168 धावांनी पराभव केला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर बुधवारी (1 फेब्रुवारी) झालेल्या सामन्यात विजय मिळवत टीम इंडियाने मालिका 2-1 अशी जिंकली. या सामन्यात शुभमन गिलने शानदार शतक झळकावले. त्याने 126 धावांची नाबाद खेळी खेळली. सामन्यानंतर त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ईशान किशन त्याला मारताना दिसत आहे. गिलने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्याच्याशिवाय यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन आणि लेगस्पिनर युजवेंद्र चहल दिसत आहेत. खरंतर तिघांनीही गंमत म्हणून एक मजेदार व्हिडिओ बनवला.
पहा व्हिडीओ
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)