IPL 2022, PBKS vs RR Match 52: जोस बटलरने राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाला चांगली सुरुवात करून दिली पण पंजाब किंग्सच्या (Punjab Kings) गोलंदाजांनी मोठे धक्के देत सामन्यात 190 धावांचा बचाव करता आव्हान कायम ठेवले आहे. डावाच्या 8व्या षटकात ऋषी धवनने (Rishi Dhawan) पहिल्याच चेंडूवर रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनला (Sanju Samson) वैयक्तिक 23 धावसंख्येवर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. सॅमसनला मोठा शॉट खेळायचा होता पण त्याने चेंडू हवेत उडवला आणि शिखर धवनने त्याचा झेल घेतला. देवदत्त पडिक्कल आता फलंदाजीला आला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)