मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आयपीएल (IPL) 2022 सीझनच्या सर्वात वाईट टप्प्यातून जात असताना, काही मोठ्या बदलांच्या मूडमध्ये असल्याचे दिसत आहे. मुंबई संघाने सुरुवातीचे सर्व 8 सामने गमावले असून विजयाचे खाते उघडण्यासाठी आपल्या 9व्या सामन्यात मोठा बदल करू शकते. मुंबई फ्रँचायझीने सचिन तेंडुलकरचा मुलगा आणि डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुनचा (Arjun Tendulkar) एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो सराव करताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना मुंबईने कॅप्शनमध्ये लिहिले – ‘अर्जुन अचूक फॉलो थ्रू अॅक्शन, लय भारी रे!’

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)