IPL 2022, MI vs KKR Match 14: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) फलंदाजांची निराशाजनक कामगिरी तिसऱ्या सामन्यात देखील सुरु राहिली. मुंबईने पहिले फलंदाजी करून निर्धारित 20 षटकांत 4 बाद 161 धावा केल्या आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघासमोर विजयासाठी 162 धावांचे लक्ष्य ठेवले. मुंबईच्या आघाडीचे खेळाडू अपयशी ठरल्यावर सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि तिलक वर्मा (Tilak Varma) यांच्यातील अर्धशतकी भागीदारीने संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. सूर्यकुमारने सर्वाधिक 52 धावा केल्या. तर किरॉन पोलार्ड (Kieron Pollard) 5 चेंडूत नाबाद 22 धावा आणि तिलक वर्मा याने नाबाद 38 धावांचे योगदान दिले. याशिवाय अंडर-19 स्टार डेवाल्ड ब्रेविस 29 धावा केल्या. दुसरीकडे, केकेआरकडून पॅट कमिन्सने (Pat Cummins) दोन गडी बाद केले तर उमेश यादव आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
Action replay ekdum! ♾
Polly तात्या helps us post 1⃣6⃣1⃣!💪#MI: 161/4 (20)#OneFamily #दिलखोलके #MumbaiIndians #KKRvMI #TATAIPL https://t.co/KTHwZUqfho pic.twitter.com/mJaQCpn5Vo
— Mumbai Indians (@mipaltan) April 6, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)