IPL 2022, KKR vs LSG: कोलकाताविरुद्ध लखनऊचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय; दोन्ही संघ बदलांसह मैदानात, पहा प्लेइंग XI

IPL 2022, KKR vs LSG: आयपीएल 2022 चा 66 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात होणार आहे. या सामन्यात लखनऊ प्लेऑफचे तिकीट मिळवण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. तर कोलकाताही विजयासह चौथ्या क्रमांकावर उडी घेण्याचा प्रयत्न करेल पण त्यांना इतर संघांच्या निकालावरही लक्ष ठेवून राहावे लागेल.

IPL 2022, KKR vs LSG: कोलकाताविरुद्ध लखनऊचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय; दोन्ही संघ बदलांसह मैदानात, पहा प्लेइंग XI
क्विंटन डी कॉक आणि केएल राहुल (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, KKR vs LSG: कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आयपीएल (IPL) 2022 लीग सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) विरुद्ध मैदानात उतरणार आहे. डीवाय पाटील स्टेडियमवरील सामन्यात लखनऊचा कर्णधार केएल राहुलने (KL Rahul) नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. लखनऊने प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल केले आहेत. तर केकेआरने प्लेइंग इलेव्हनमध्ये अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) जागी अभिजीत तोमरला पदार्पणाची संधी दिली आहे. तर मनन वोहराने लखनऊसाठी आयपीएल डेब्यू केले आहे.

लखनऊ आणि कोलकाताचे प्लेइंग इलेव्हन खालीलप्रमाणे आहेत

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 18, 2022 06:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).