IPL 2022, KKR vs GT Match 35: कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्धच्या आयपीएल (IPL) सामन्यात गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) कर्णधार हार्दिक पांड्याचे (Hardik Pandya) अर्धशतकी खेळीच्या जोरावर निर्धारित षटकांत 9 बाद 156 धावा केल्या आहेत. अशाप्रकारे केकेआर संघाला विजयासाठी 157 धावांचे आव्हान मिळाले आहे. कोलकात्यासाठी आंद्रे रसेलने (Andre Russell) सर्वाधिक चार विकेट घेतल्या. तर टिम साउदीने तीन आणि उमेश यादव व शिवम मावी यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. दुसरीकडे, गुजरात संघासाठी कर्णधार हार्दिकने सर्वाधिक 67 धावा चोपल्या. तसेच डेविड मिलरने 27 आणि रिद्धिमान साहाने 25 धावांचे छोटेखानी योगदान दिले.
Match 35. WICKET! 19.6: Yash Dayal 0(1) ct & b Andre Russell, Gujarat Titans 156/9 https://t.co/GO9KvGCpqo #KKRvGT #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)