IPL 2022, DC vs RR Match 34: राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्धच्या सामन्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्ससाठी (Delhi Capitals) आणखी वाईट बातमी समोर आली आहे. मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग (Ricky Ponting) रॉयल्सविरुद्ध सामन्यासाठी डगआऊटमध्ये उपस्थित राहणार नाहीत. त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर पाँटिंग सध्या आयसोलेशनमध्ये आहेत. तथापि, पाँटिंगची दोनदा चाचणी निगेटिव्ह आली आहे परंतु ते त्या व्यक्तीच्या जवळच्या संपर्कात आल्याने त्याला क्वारंटाईन ठेवण्यात आले आहेत. पॉन्टिंग आता पाच दिवस आयसोलेशनमध्ये राहतील.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)