IPL 2022, CSK vs GT: शनिवारी निधन झालेल्या ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू सायमंड्स (Andrew Symonds) यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि गुजरात टायटन्स (GujaratTitans) संघ रविवारी आयपीएल 2022 च्या सामन्यादरम्यान काळी पट्टी बांधून मैदानात उतरला आहे. ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडजवळ झालेल्या एका भीषण कार अपघातात 46 वर्षीय सायमंड्सचा मृत्यू झाला. 11 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत सायमंड्सने 6400 हून अधिक धावा केल्या आणि 165 बळी घेतले. तसेच 2003 आणि 2007 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय विश्वचषक विजयातही तो महत्त्वाचा सदस्य होता.
Rest In Peace, Andrew Symonds.
Your presence around the game will be missed. 🙏@ChennaiIPL and @gujarat_titans will be wearing black armbands to pay their respects to Andrew Symonds. pic.twitter.com/X9bLS3mrvO
— IndianPremierLeague (@IPL) May 15, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)