IPL 2022, CSK vs GT: गुजरातची कसून गोलंदाजी; चेन्नई सुपर किंग्सला 133/5 धावांत रोखले, Ruturaj Gaikwad ने ठोकले जोरदार अर्धशतक
IPL 2022, CSK vs GT Match 62: गुजरात टायटन्स संघाने शानदार गोलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सला 5 बाद 133 धावांवर रोखले आहे. अशाप्रकारे गुजरातला विजयासाठी 134 धावांचे माफक लक्ष्य मिळाले आहे. चेन्नईसाठी ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक 53 धावा केल्या. तर एन जगदीशन 39 धावा करून नाबाद राहिला. तसेच गुजरातकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या.
IPL 2022, CSK vs GT Match 62: गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाने शानदार गोलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) 5 बाद 133 धावांवर रोखले आहे. अशाप्रकारे गुजरातला विजयासाठी 134 धावांचे माफक लक्ष्य मिळाले आहे. चेन्नईसाठी ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) सर्वाधिक 53 धावा केल्या. तर एन जगदीशन (N Jagadeesan) 39 धावा करून नाबाद राहिला. तसेच मोईन अलीने 21 धावांचे छोटेखानी योगदान दिले. दुसरीकडे, गुजरातकडून मोहम्मद शमीने (Mohammed Shami) सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. राशिद खान, अल्झारी जोसेफ आणि आर साई किशोरने प्रत्येकी 1-1 गडी बाद केला.
Innings Break! @gujarat_titans put on a solid show with the ball to restrict #CSK to 133/5. 👌 👌
Will @ChennaiIPL manage to defend the total? 🤔 🤔
Scorecard ▶️ https://t.co/wRjV4rFs6i #TATAIPL | #CSKvGT pic.twitter.com/5EIO3XOYOH
— IndianPremierLeague (@IPL) May 15, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 15, 2022 05:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

