T Natarajan Ruled out of IPL 2021: सनरियर्स हैदराबादच्या (Sunrisers Hyderabad) संघाला मोठा धक्का बसला आहे कारण त्यांचा वेगवान गोलंदाज टी नटराजन (T Natarajan) दुखापतीमुळे इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 2021 मोसमातून बाहेर पडला आहे. ESPNcricinfo ने दिलेल्या माहितीनुसार ऑस्ट्रेलिया दौर्‍यादरम्यान नटराजनला गुडघ्याच्या दुखापत झाली होती जी आता पुन्हा एकदा समोर येऊ लागली आहे. दुखापतीची तीव्रता पाहता बीसीसीआय त्याला पुनर्वसनसाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पाठवू शकते आणि फ्रॅंचायझीला त्याला रिलीज करण्यास सांगू शकते. सध्या नटराजन सनरायझर्सची टीम बबलमध्ये आहे. नटराजनने या मोसमात पहिले दोन सामने खेळले होते, परंतु त्यानंतर दुखापतीमुळे त्याला बाहेर बसावे लागले. तथापि नटराजनच्या दुखापतीविषयी आणि त्याच्या बाहेर पडण्याबाबत फ्रँचायझीकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन समोर आलेले नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)