भारताच्या महिला क्रिकेट संघाच्या सदस्यांनी तिरुपती बालाजी मंदिराला भेट दिली आणि प्रार्थना केली. काही दिवसापुर्वी भारतीय महिला क्रिकेट संघानेही चाहत्यांना आनंदाची मोठी संधी दिली आहे. हरमनप्रीत कौरच्या संघाने भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात चेन्नई येथे खेळल्या जाणाऱ्या एकमेव कसोटीत विजय मिळवला आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाकडून दक्षिण आफ्रिकेचा एकतर्फी 10 गडी राखून पराभव केला. या विजया नंतर आज हरलीन कौर, शेफाली वर्मासह अन्य भारतीय खेळाडूंनी भगवान बालाजीचे दर्शन घेतले.
पाहा पोस्ट -
#WATCH | Andhra Pradesh: Members of India's women's Cricket team visit and offer prayers at the Tirupati Balaji Temple. pic.twitter.com/ElSmgacdQP
— ANI (@ANI) July 3, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)