IND vs SA: दक्षिण आफ्रिकेसोबतच्या कसोटी मालिकेपूर्वी ऋतुराज गायकवाडच्या (Ruturaj Gaikwad) रूपाने भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. ऋतुराज दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर होता. त्यानंतर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ऋतुराज गायकवाड यांच्या बदलीची घोषणा केली आहे. आता कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात ऋतुराज गायकवाडच्या जागी अभिमन्यू ईश्वरनचा (Abhimanyu Easwaran) समावेश करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यादरम्यान ऋतुराज गायकवाडला दुखापत झाली होती. या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना गायकवाड यांच्या बोटाला दुखापत झाली होती. त्यामुळे गायकवाड मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यातही खेळू शकले नाहीत. या सामन्यात त्याच्या जागी रजत पाटीदारचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला. रजत पाटीदारचा हा पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना होता. सध्या ऋतुराज गायकवाड बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहेत. (हे देखील वाचा: Rohit Sharma To Be MI Captain: हार्दिक पंड्या अफगाणिस्तान टी-20 मालिकेपर्यंत बरा होण्याची शक्यता नाही, आयपीलमध्ये खेळण्याची शक्यताही कमी)
🚨 NEWS 🚨
Ruturaj Gaikwad ruled out of the #SAvIND Test series.
The Selection Committee has added Rajat Patidar, Sarfaraz Khan, Avesh Khan & Rinku Singh to India A’s squad while Kuldeep Yadav has been released from the squad.
Details 🔽 #TeamIndia
— BCCI (@BCCI) December 23, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)