भारतीय आणि जागतिक क्रिकेटमधील दिग्गजांपैकी एक असलेला विराट कोहली 5 नोव्हेंबर रोजी 35 वर्षांचा झाला. हा दिग्गज 2008 मध्ये पदार्पण केल्यापासून चाहत्यांचे सतत मनोरंजन करत आहे. कोहलीने 2008 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि तेव्हापासून त्याने मागे वळून पाहिले नाही. इतक्या वर्षात स्टार क्रिकेटपटू भारतीय फलंदाजीचा कणा बनले आहेत. मधे अनेक चढउतार आले पण फॉर्म कायमच अबाधित राहिला. त्याच्या 35व्या वाढदिवसानिमित्त टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड आणि शुभमन गिल, आर अश्विन, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांसारख्या अनेक खेळाडूंनी स्टार फलंदाज विराट कोहलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्याच्या प्रवासाविषयी बरंच काही सांगितलं. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (हे देखील वाचा: Virat Kohli Birthday: कोलकात्यात चाहत्यांनी साजरा केला विराट कोहलीचा 35 वा वाढदिवस, केकही कापला, पाहा व्हिडिओ)

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)