टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना आज इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. पहिले दोन एकदिवसीय सामने जिंकल्यानंतर टीम इंडियाने या मालिकेत आधीच 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. अशा स्थितीत भारतीय संघ ही मालिका 3-0 ने जिंकण्याचा प्रयत्न करेल. न्यूझीलंड संघाचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, टीम इंडियाने प्रथम फलंदांजी करत न्यूझीलंडसमोर 386 धावाचे लक्ष ठेवले आहे. भारताकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिलने शतकीय पारी खेळली. न्यूझीलंडकडून जेकब डफी आणि ब्लेअर टिकनर यांनी सर्वाधिक 3-3 बळी घेतले. न्यूझीलंडला हा सामना जिंकण्यासाठी 50 षटकात 386 धावा करायच्या आहेत.
60 runs and 3 wickets off the last 5 overs
India end with 385/9 #INDvNZ https://t.co/Ap1FZ9iNLC
— Cricbuzz (@cricbuzz) January 24, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)