भारत आणि आयर्लंड (IND vs IRE) यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना डब्लिन येथे होणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार जिंकला होता आणि आता दुसरा सामनाही जिंकून टीम इंडियाला मालिका आपल्या नावावर करायची आहे. त्याचबरोबर हा सामना जिंकून मालिकेत कायम राहण्याचा आयर्लंडचा प्रयत्न असेल. आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर प्रथम फलंदांजी करताना भारताने आयर्लंडसमोर 186 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)