IND vs AFG  1stT20  Highlights: टीम इंडिया आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना आज मोहालीतील पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने अफगाणिस्तानचा सहा गडी राखून पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. मोहालीत तत्पूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या अफगाणिस्तान संघाने 20 षटकांत 5 गडी गमावून 158 धावा केल्या. अफगाणिस्तान संघाकडून मोहम्मद नबीने सर्वाधिक 42 धावांची खेळी केली. टीम इंडियाकडून अक्षर पटेल आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या टीम इंडियाने अवघ्या 17.3 षटकांत चार गडी गमावून लक्ष्य गाठले. स्टार अष्टपैलू शिवम दुबेने टीम इंडियासाठी सर्वाधिक नाबाद 60 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून मुजीब उर रहमानने सर्वाधिक दोन बळी घेतले. टीम इंडिया आणि अफगाणिस्तान यांच्यातील मालिकेतील दुसरा सामना रविवारी म्हणजेच 14 जानेवारीला इंदूरमध्ये होणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)