रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) आपल्या कसोटी कारकिर्दीत प्रथमच 150 धावांचा टप्पा पार केला. त्याने 211 चेंडूत 16 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 150 धावा पूर्ण केल्या. यापूर्वी जडेजाने आपल्या फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाची (Indian Team) धावसंख्या 500 धावांच्या पार पोहचवली. टीम इंडियाने बऱ्याच कालावधीनंतर ही कामगिरी केली आहे. भारताने शेवटी 2019 मध्ये पुण्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एका डावात 500 हून अधिक धावा केल्या होत्या.
150 for @imjadeja and he brings this up in style with a maximum 👏💪
Live - https://t.co/XaUgOQVg3O #INDvSL @Paytm pic.twitter.com/TMrfFi2YZ5
— BCCI (@BCCI) March 5, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)