IND vs SL 1st Test Day 1: विराट कोहली 8000 कसोटी धावा करणारा सहावा भारतीय फलंदाज, दिग्गज खेळाडूंच्या यादीत झाला समावेश

IND vs SL 1st Test: मोहालीमध्ये 100वी कसोटी खेळणारा विराट कोहली शुक्रवारी श्रीलंकेविरुद्ध मालिकेतील पहिल्या सामन्यात कसोटी क्रिकेटमध्ये 8000 धावा करणारा केवळ सहावा भारतीय फलंदाज ठरला. एकूणच, कसोटी क्रिकेटमध्ये 8000 धावा करणारा कोहली हा 33वा फलंदाज ठरला आहे. उल्लेखनीय म्हणजे, 100 कसोटी सामने खेळणारा कोहली 12वा भारतीय आहे

IND vs SL 1st Test Day 1: विराट कोहली 8000 कसोटी धावा करणारा सहावा भारतीय फलंदाज, दिग्गज खेळाडूंच्या यादीत झाला समावेश
विराट कोहली (Photo Credit: PTI)

IND vs SL 1st Test Day 1: भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यातील मोहाली (Mohali) येथील PCA स्टेडियमवर सुरु असलेल्या पहिल्या कसोटीत विराट कोहलीने (Virat Kohli) शुक्रवारी आपल्या 100 व्या कसोटी सामन्यात आणखी एक विशिष्ट विक्रम नोंदवला. कसोटी क्रिकेटमध्ये 8000 धावा करणारा कोहली 6 वा भारतीय फलंदाज आणि हा टप्पा गाठणारा देशातील पाचवा सर्वात वेगवान फलंदाज ठरला. यासह विराट सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सुनील गावस्कर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि वीरेंद्र सेहवाग यांच्या एलिट यादीत सामील झाला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 04, 2022 01:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).