India National Cricket Team vs England National Cricket Team: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड क्रिकेट संघ यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना (IND vs ENG 3rd T20I 2025) आज राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियमवर (Niranjan Shah Stadium, Rajkot ) खेळवला जात आहे. या मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात भारताने चांगली सुरुवात केली. हार्दिक पटेलने आपल्या पहिल्याच षटकांत फिल सॉल्टला 5 धावांवर बाद केले. सध्या इंग्लंडची धावसंख्या 2 षटकानंतर 1 बाद 12 अशी आहे.
पाहा पोस्ट -
Early strike ✅
Hardik Pandya with a wicket in his first over! 👌 👌
Updates ▶️ https://t.co/amaTrbtzzJ#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/bwpOTwAeHb
— BCCI (@BCCI) January 28, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)