Australia National Cricket Team vs India National Cricket Team: भारत-ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला (Border-Gavaskar Trophy 2024-25) आजपासून सुरुवात होत आहे. पर्थ येथे होणाऱ्या मालिकेतील पहिल्या कसोटीला सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. जसप्रीत बुमराह पहिल्या कसोटीत कार्यवाहक कर्णधार म्हणून टीम इंडियाची जबाबदारी घेत आहे, कारण नियमित कर्णधार रोहित शर्मा त्याच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मामुळे भारतात आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाची धुरा पीट कमिन्सच्या हाती आहे. दरम्यान, भारताने टाॅस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यातून हर्षित आणि नितीश कुमार रेड्डी कसोटी पदार्पण करत आहेत. अश्विनने पदार्पणाची कॅप हर्षितकडे आणि विराटने पदार्पणाची कॅप नितीशकडे दिली.
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवुड
भारत (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह (कर्णधार), मोहम्मद सिराज
🚨 Toss & Team News from Perth 🚨
Jasprit Bumrah has won the toss & #TeamIndia have elected to bat in the first Test.
Nitish Kumar Reddy & Harshit Rana make their Test debuts 🧢🧢 for India.
A look at our Playing XI 🔽
Live ▶️ https://t.co/gTqS3UPruo#AUSvIND pic.twitter.com/EvO9XaOG9q
— BCCI (@BCCI) November 22, 2024
1st TEST. India Won the toss and elected to bat. https://t.co/dETXe6cqs9 #AUSvIND
— BCCI (@BCCI) November 22, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)